Share

‘भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागात जनतेशी संवाद साधण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याकरिता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्या आहेत. या यात्रांना गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. मुंबई येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी यात्रेवर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, ‘जनआशीर्वीद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. ज्याप्रकारे या गर्दीचे नियंत्रण आहे. लोकांना एकत्र करताय हे तिसऱ्या लाटेचे आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे करताय, म्हणजे मुद्दामहूनच. पण, किमान संयम पाळा’, असेही राऊत यांनी म्हटले.

तसेच देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप ५ मध्ये आले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्याचे कौतुक केले. यावर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले नसल्याची टीका भाजपने केली. यावरून राऊत भाजपवर चांगलेच भडकले. ‘मुख्यमंत्री घरातून बाहेर न पडताच टॉप 5 मध्ये आले का? विरोधी पक्ष फक्त नेहमी टीका करत राहतो. कोरोना काळात सर्वांचंच काम वर्क फ्रॉम होम होतं. तुम्ही उकिरडे फुंकत हिंडलात सगळीकडे’ अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!