ठाणे : देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाच जणांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक आला आहे. ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या ११ मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. याबाबत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आनंदासह अभिमान व्यक्त केला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटल्याचा दावा सर्व्हेतून करण्यात आला आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरून कमी होऊन २४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ३८ टक्के, तर ऑगस्ट २०२० मध्ये ६६ टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. या महिन्यात केवळ २४ टक्के लोकांनी मोदींना पसंती दिल्याचे ‘इंडिया टुडे’ ने सांगितले.
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सर्व्हेवर शंका उपस्थित केली आहे. ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘सर्व्हे करणाऱ्यांना कसलीही अॅथोरिटी नाही. एखादी संस्था सर्व्हे करते तेव्हा ती कशाच्या आधारावर करते? त्याबाबत आम्ही खोलात जात नाही. जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे.
जन आशीर्वाद यात्रेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठी जनता आहे हे दिसून येत आहे. हाच आमचा सर्व्हे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक जमले. फडणवीस यांनी पूर काळात मोठं काम केलं होतं. लोक त्याची आठवण करत होते. फडणवीस हेच आपल्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असेही लोक म्हणत होते. आमच्यासाठी हेच महत्त्वाचे आहे. एखादी संस्था किंवा चॅनेलचा सर्व्हे हा काही अॅथोराईज निर्णय होऊ शकत नाही’, अशी टीका त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
