मुंबई : कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नाहीत, यावरून विरोधक सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. गेल्या महिन्यांत पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावरूनही भारतीय जनता पक्षाने बाहेर पडण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोले लगावले. मुख्यमंत्री मातोश्री बाहेर जात नसल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडी पक्षाला यावरून नेहमीच बोलणे ऐकावे लागतात.
मात्र, असे असतानाही देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप ५ मध्ये आले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्याचे कौतुक केले. यावर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले नसल्याची टीका भाजपने केली. यावरून राऊत भाजपवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. ‘मुख्यमंत्री घरातून बाहेर न पडताच टॉप ५ मध्ये आले का? विरोधी पक्ष फक्त नेहमी टीका करत राहतो. कोरोना काळात सर्वांचंच काम वर्क फ्रॉम होम होतं. तुम्ही उकिरडे फुंकत हिंडलात सगळीकडे’ अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकवेळा सर्वेक्षण झाले तेव्हा टॉप १० किंवा टॉप ५ मध्ये आले आहेत. काही काळापूर्वीही ते टॉप १० मध्ये आले होते. आता ते टॉप ५ मध्ये आले आहेत. आपल्या कार्यकुशलतेतून ते हळूहळू देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनतील’ या शब्दात राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘उद्धव ठाकरेंनी गेल्या दोन वर्षांत राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी मोठे काम केले आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल जगाने घेतली, सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. राजकीय विरोधक काहीही म्हणतील. पण, देशातील जबरदस्त नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडेच पाहिले जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशातील टॉप ५ मध्ये आल्याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच ते टॉप १ मध्ये जातील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
