बुलडाणा : सध्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव सुरू आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक वीज गेल्याने आणखीन त्रस्त होतात. महावितरण कार्यालयात फोन करूनही वीज कधी येणार? का गेली? परत कधी जाणार आहे? यासारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. म्हणून आता महावितरणने यावर एक उपाय शोधला आहे.
वीज का गेली, महावितरणचे वीज बिल किती आले, मीटर रिडींग झाली की नाही या व अशाप्रकारच्या वीज ग्राहकांना उपयुक्त असणाऱ्या माहितींच्या घडामोडी महावितरणकडून सातत्याने देण्यात येतात. या घडामोडी ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या अधिकृत मोबाईलवर पाठविण्यात येतात. त्यामुळे अशी महत्वपूर्ण माहिती प्राऊट करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींची माहिती दरमहा ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी तसेच घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांनीही आपल्या मोबाईलची नोंदणी करून महावितरणच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
अशी करा नोंदणी
ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते.सोबतच ग्राहकांना आपला मोबाईल नंबर बदल करावयाचा असल्यास वरील पध्दतीने करू शकतात. याशिवाय २४×७ सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अँपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- वऱ्हाड निघालंय पोलीस स्टेशनला! हळदीला गर्दी झाल्याने महिला सरपंचावर गुन्हा
- राज्य सरकारने आकडेवारीची लपवाछपवी करू नये-फडणवीस
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा


