नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. विविध उपाययोजना करूनही संसर्ग रोखण्यास अपयश येत आहे. पण भारतातील भयावह कोरोना लाटेसाठी विषाणूचे केवळ एक म्युटेशन जबाबदार नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक पहिली लाट ओसरताच मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरिएंट आणि मंदगतीने होणारे लसीकरण यामुळे भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे परखड मत जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे.
भारतात आलेल्या कोरोना सुनामीसाठी केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही. कोरोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही आठवड्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी लक्ष वेधले.
कोरोना रुग्णांपैकी केवळ १५ टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज पडते. त्यामध्येही अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक आपल्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करीत आहेत. ८५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे गरजेचे आहे, असे तारिक म्हणाले. तर भारताला ४ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार असून २ हजार तज्ज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे अशी माहिती अध्यक्ष तेद्रोस अॅडहॉनम घेब्रयासिस यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
- मोठी बातमी : देशातील दीडशे जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर
- ‘आता जनतेने केंद्र सरकारविरोधात बंड पुकारले पाहिजे’
- मोठी बातमी; खेळाडु, समालोचकानंतर दोन पंचानी घेतली आयपीएल स्पर्धेतून माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

