Share

पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा

Published On: 

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गट्टा जांभा हद्दीतील जंगल परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवादी ठार झाले. शासनाने त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षीस ठेवले होते. विनय लालू नरोटे व विवेक उर्फ सुरज उर्फ मनोहर लालू नरोटे अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

२१ एप्रिल २०२१ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टावर गोळीबार करण्याच्या घटनेत मृतक नक्षलवाद्यांचा सहभाग होता. शासनाने त्यांच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. गट्टा जंगल परिसरात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते काही घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात गट्टा जंगल परिसरात सी-६० पोलीस जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते.

दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते २५ नक्षलवाद्यांनी पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. पोलिसांनी स्वरक्षणासाठी प्रत्त्युतरादाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाचा फायदा घेत पळून गेले. चकमकीनंतर पोलिसांनी शोध अभियान राबविले असता, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळावरून एक ९ एमएम पिस्टल, एक भरमार व स्फोटक साहित्य व नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. चकमकीत आणखी नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!