Share

वऱ्हाड निघालंय पोलीस स्टेशनला! हळदीला गर्दी झाल्याने महिला सरपंचावर गुन्हा

Published On: 

भुसावळ : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध कडक नियम लागू केलेत. पण काही महाभाग नियम डावलून लग्नसोहळे करत आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी लावलेले कठोर निर्बंध धुडकावून बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे लग्न समारंभातील हळदीसाठी दीडशे वऱ्हाडींची उपस्थिती होती. या प्रकरणी पोलिस पाटलाच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसांत चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुक्तळ येथे विशाल विलास साबळे यांचे लग्न होते. दि.२८ एप्रिल रोजी त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता. पण यावेळी तेथे तब्बल १५० लोकांची उपस्थिती होती. त्यात फिजिकल डिस्टन्स पाळले गेले नाही. विशेष म्हणजे गावात कोरोनाचे आठ रुग्ण असताना देखील खबरदारी न घेताच गर्दी जमवण्यात आली.

तर सरपंच पल्लवी पाटील यांनी देखील या लग्नसमारंभाबाबत वरिष्ठांना माहिती न देता नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे साथरोग नियंत्रणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुक्तळ येथील पोलिस पाटील युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र रमेश पाटील, विशाल विलास साबळे, तुषार विलास साबळे व सरपंच पल्लवी जितेंद्र पाटील यांच्याविरूद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला. या कारवाईमुळे गुपचुपपणे धुमधुडाक्यात लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!