Share

राज्य सरकारने आकडेवारीची लपवाछपवी करू नये-फडणवीस

Published On: 

वर्धा : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. राज्य सरकराने पॉझिटिव्हची माहिती द्यावी, रुग्णसंख्या कमी झाली तर आम्हाला आनंदच होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना आजाराच्या संदर्भात वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात आढावा बैठकीत व्यक्त केले.

राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. त्याचबरोबर मृत्यूची संख्या वाढत आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लावला असूनही रुग्णसंख्या वाढत आहे. आजारावर मात करण्यासाठी लसीकरण केले जात असून वर्धा जिल्ह्यातील तीन रुग्णालयांवर अधिक भार आहे.

आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून ती वाढवण्याची गरज आहे. त्वरित प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. रुग्णांची वाढती संख्या बघता अतिदक्षता विभागातील खाटा व साधारण खाटा वाढवण्याची गरज आहे. राज्य शासनाने आकडेवारीची लपवाछपवी करू नये, पॉझिटिव्ह माहिती द्यावी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे, रुग्णसंख्या कमी झाली तर आम्हाला आनंदच होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!