धुळे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर उपाययोजना, ऑक्सिजनची व्यवस्था करणे गरजेचे होते. पण याकडे शासनाने डोळेझाक केली. त्यामुळे आता परिस्थिती गंभीर झाली आहे. यात केंद्र सरकरार अपयशी ठरले आहे, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला. केंद्राच्या तुलनेत महाराष्ट्र सरकावर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्याने स्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये स्थिती अतिशय गंभीर आहे असे पाटकर म्हणाल्या.
मेधा पाटकर यांनी धुळे येथे असंघटित कामगारांची भेट घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या , कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकारने आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणाकडे लक्ष देणे आवश्यक होते. शासनाने बजेटची प्राथमिकता बदलत आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिक निधीची तरतूद करण्याची गरज आहे. सातवा वेतन आयोग लागू केला. अधिकाऱ्यांचे वेतन वाढले. मात्र, रिक्त जागा भरण्याकडे लक्ष दिले नाही.
राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक्स-रे मशीन बसवण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. राज्यात अंशत: लॉकडाऊनमुळे निर्माण होणारी उपासमार थांबवण्यासाठी शिवभोजन फायदेशीर ठरते आहे. मात्र, त्यापुढे जाऊन वसाहती आणि कॉलन्यांचा विचार करून कम्युनिटी किचनची व्यवस्था झाली पाहिजे. प्रत्येक रेशनकार्डवर १५ किलो धान्य मिळाले पाहिजे, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्यात यावी. असंघटित कामगारांची नोंदणी व्हावी असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
- मोठी बातमी : देशातील दीडशे जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

