🕒 1 min read
इंग्लंड : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. पण अजूनही भारताने आपल्या अंतिम-11 खेळाडूंबाबत निर्णय घेतलेला नाही. यावरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपले मत व्यक्त केले आहे. त्याबरोबर सचिनने बऱ्याच मुद्यावर भाष्य केलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान सचिन तेंडुलकर म्हणाला की, इंग्लंडमध्ये काय करावे हे टीम इंडियाला माहित आहे. त्यांना सल्ल्याची गरज नाही. आम्ही ऑस्ट्रेलिया दौर्यापासून वर्षाची सुरूवात केली. यानंतर टीम इंडियाने मायदेशी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली. दोन्ही ठिकाणी हवामान वेगळे होते. इंग्लंडमध्ये हवामान वेगळे असेल.
विराट आणि शुबमनला तुम्ही काय सल्ला द्याल? या प्रश्नावर सचिन म्हणाला, ‘कोणत्याही फलंदाजाला इंग्लंडमधील फ्रंटफूट बचावावर लक्ष केंद्रित करावे लागते. अंतिम सामन्यासाठीच्या संघ संयोजनाविषयी सचिनने सांगितले की रवींद्र जडेजा आणि आर अश्विन ऑर्डरमध्ये उतरू शकतात आणि आवश्यक धावा करू शकतात. लोक फक्त खेळपट्टीबद्दल बोलतात, परंतु हवेबद्दल बोलत नाही. अश्विन आणि जडेजा हे चांगले फिरकीपटू आहेत आणि दर्जेदार फिरकी गोलंदाज कोणत्याही मैदानात चांगली गोलंदाजी करू शकतात. अश्विन आणि जडेजाला चेंडूचे तेज कसे वापरायचे ते माहित आहे.
एम. सिराज आणि इशांत शर्मा यांच्यात अंतिम सामन्यात कोणाला संधी मिळाली? या प्रश्नावर सचिन म्हणाला की दोघेही चांगले गोलंदाज आहेत. फॉर्मकडे पाहिलं तर सिराजने खेळायला हवं, पण इंग्लंडमधील अनुभव आणि मागील कामगिरी पाहिल्यास त्यामध्ये इशांत भारी पडतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- ‘…तरच मला टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळू शकेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
