इंदोर : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
संपूर्ण देश आता अशा भीषण परिस्थितीमधून सावरत असताना देशावर आता म्युकरमायकोसीस या आजाराचे संकट पुढे ठेपले आहे. देशभर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोरोनानंतर काळ्या, पांढर्या आणि पिवळ्या बुरशीचे प्रकार रुग्णांमध्ये आढळले आहेत. पण आता इंदूरमध्ये देशातील पहिला हिरव्या बुरशीची बाधा झालेला रुग्ण आढळला आहे.
इंदूरच्या शासकीय व खासगी रुग्णालयात काळ्या बुरशीचे 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आता इंदूरमध्ये हिरव्या बुरशीच्या रुग्णाचे निदान झाले आहे. देशातील ही पहिली घटना आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होत आहे. मात्र आता इंदूरमध्ये नव्या हिरव्या बुरशीजन्य संसर्गाने चिंता वाढली आहे. कोरोनानंतर काळ्या, पांढर्या आणि पिवळ्या बुरशीचे प्रकार आढळले आहेत. पण आता इंदूरमध्ये देशातील अशी पहिली घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 90 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला हिरव्या बुरशीची बाधा झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसीकरणाबाबत आता लबाडी, खोटेपणा नको ; राहुल गांधींचा घणाघात
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा


