Share

अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सोमवारी जाहीर केलेल्या बीकॉम पहिल्या सत्राचा कम्प्यूटर ऍप्लिकेशन या विषयात बहुतांशी विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. दरम्यान परीक्षेतील तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

दुसऱ्या दिवशी अनेक स्थानिक विद्यार्थी पालक विद्यार्थी संघटनांनी परीक्षा विभागाकडे धाव घेऊन या संदर्भात विचारणा केली. मात्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी बीकॉम अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राचा कम्प्युटर ऍप्लिकेशन विषयाच्या परीक्षेतील पहिला पेपर आणि त्याचे अन्सर की हे बरोबर असल्याचे सांगत विद्यार्थी पेपर सोडवण्यातच कमी पडले असावेत असा निष्कर्ष काढला. त्यामुळे परीक्षेचे गुण बदलण्याचा मुद्दा नाही असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमात अनेक हुशार विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

केवळ या एकाच विषयात त्यांना शून्य गुण मिळाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयाचा संपूर्ण पेपर सोडवल्यानंतर काहीतरी गुण मिळायला हवे होते. पण शून्य गुण मिळूच शकत नाही असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. ऑनलाइन परीक्षेच्या वेळी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असावा त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मंगळवारी विद्यार्थी काँग्रेसचे मोहित जाधव, पंकज सपकाळ, मित्रवर्धन काळे आदी पदाधिकाऱ्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांची भेट घेतली व या विषयाचा पेपर ची पूर्ण तपासणी करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!