मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवची भारतीय संघात निवड झाली झाली आहे. मागील काही काळापासून कुलदीप यादवला चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप भारताचा प्रमुख फिरकीपटू होता. मात्र सातत्याने खराब कामगिरी करत असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळवणेही अवघड झाले आहे. मात्र श्रीलंका दौऱ्यावर तसेच त्यानंतर उर्वरित आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून चांगली कामगिरी केल्यास यंदा होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळेल अशी कुलदीपला आशा आहे.
‘टी-२० क्रिकेटमध्ये संघात स्थान देताना खेळाडूच्या कामगिरीचा विचार केला जातो. आगामी श्रीलंका दौरा आणि त्यानंतरची आयपीएल स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यास मला टी-२० वर्ल्डकपसाठी संधी मिळू शकेल. आणि माझी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील माझी निवड होऊ शकेल असे कुलदीपने सांगितले आहे’
महत्त्वाच्या बातम्या
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज कंपनी करणार मराठवाड्यात गुंतवणूक!
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा


