मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने मराठा समाज नाराज झाला आहे. कोरोनाचा काळ असल्याने समाजाने संयम ठेवले असून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात आजपासून मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा एकदा सुरु झाले आहे. मराठा समाजासाठी लोकप्रतिनिधींनी काय केलं ? असा जाब विचारण्यात आला असून राज्याने विशेष अधिवेशन घ्यावं आणि सर्व खासदारांनी केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्याकडे एकमताने मागणी करावी अशी भूमिका मांडली जात आहे.
तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरु आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टिप्पणी केली होती. संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. आता राऊत यांनी आपल्या खास शैलीत दानवेंना प्रत्युत्तर दिलंय.
‘राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री असोत. पक्षाचे आदेश, सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडे चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळे लावले आणि आमच्या सत्तेचे टाळे उघडले, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, ‘राजकारणात कुलूप आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात. ज्याच्याकडे कुलूप आहे, तो कुठल्याही गोष्टीला टाळे लावू शकतो आणि ज्याच्याकडे चावी आहे, तो कुठलेही टाळे उघडू शकतो. आमच्याकडे चावी आहे. त्या चावीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ व्हिडीओचा सो कॉल्ड राड्याशी संबंध नाही; मनसे नेत्याने उडवली शिवसेना-भाजपची खिल्ली
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- ‘औरंगाबाद ग्रामीणलाही तीन मधून लेव्हल एक मध्ये आणण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा’
- गाफीलपणा टाळा…पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत आजही वाढ !


