औरंगाबाद: शिवसेना आणि भाजप गेल्या अनेक वर्षांपासून सोबत होते. मात्र सत्तेच्या राजकारणामुळे ही युती संपुष्टात आली आणि शेवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेवर आली. तेव्हा पासून शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. ही युती तुटल्याचा आणि दोन्ही पक्षातील वादाचा फटका मात्र महारष्ट्रातील जनतेला बसत आहे, पण हा त्रास सामान्य जनतेने का भोगावा, असा सवाल लोकसभेत खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
लोकसभेत आज वित्त विधेयकाच्या चर्चेत इम्तियाज जलील सहभागी झाले होते, त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या समोर त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे २८ हजार कोटी मिळणार होते पण ते अजूनही मिळाले नाहीयेत, यामागचे कारण शिवसेना आणि भाजप युती तुटल्याचे आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही युती तुटल्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला त्याचा हक्काचा पैसा दिला जात नाही, असे स्पष्ट दिसते. याचा फटका महाराष्ट्रातील जनतेला सोसावा लागत आहे. तुमची युती तुटली यात महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची चूक नाही. तरी तुमच्यातल्या वादाचा फटका जनतेने का सोसावा, असा रोखठोक सवाल जलील यांनी लोकसभेत उपस्थित केला.
जलील यांनी लोकसभेत खरमरीत प्रश्न उपस्थित करून सर्वांचा चांगलाच समाचार घेतल्याचे चित्र लोकसभेत बघायला मिळाले. संसदेची नवीन इमारत सात हजार पाचशे कोटी रुपये खर्चून करण्यापेक्षाही महत्वाचे अनेक कामे करणे गरजेचे आहे, सध्या देशाला चांगले हॉस्पिटल, शाळा तसेच इतर अनेक गोष्टींची गरज आहे, अशा परिस्थितीत नवीन संसदेची इमारत तयार केली जात आहे. त्यापेक्षा हा पैसा लोकांच्या कल्याणासाठी तसेच कोरोणाची पार्श्वभूमी पाहता लोकांच्या जीवाच्या हितासाठी वापरावा असा सल्ला देखील जलील यांनी या वेळी लोकसभेत दिला.
महत्वाच्या बातम्या
- शिखर धवनने सांगितला टीमबाहेर राहण्याचा अनुभव ; म्हणाला…
- कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यात होणार मध्यरात्रीपासून लॉकडाऊन
- ‘इंडिया का अपना मंत्रा’, आयपीएल 14 चे नवीन अँथम सॉंग रिलीज
- ‘या’ कारणासाठी उस्मानाबाद पालिकेने पटकावला राज्यात पहिला क्रमांक
- टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

