Share

‘इंडिया का अपना मंत्रा’, आयपीएल 14 चे नवीन अँथम सॉंग रिलीज

Published On: 

पुणे : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

नुकतेच इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 2021 हंगामासाठी नवीन अँथम सॉंग रिलीज करण्यात आले आहे. ‘इंडिया का अपना मंत्रा’ नावाने प्रसिद्ध करण्यात आलेले हे अँथम सॉंग एक मिनिट आणि 30 सेकंदाचे आहे. आयपीएलच्या (IPL) 14 व्या सत्राची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील 09 एप्रिल रोजी होणाऱ्या सलामीच्या सामन्यातून होईल. हा पहिला सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

लीग टप्प्यात प्रत्येक संघ चार मैदानावर खेळेल. लीगच्या 56 सामन्यांपैकी चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगलोर येथे प्रत्येकी 10 सामने तर अहमदाबादमध्ये 8 सामने खेळले जातील. ट्विटरवर ‘इंडिया का अपना मंत्र’ अशा नवीन आयपीएल थीम सॉंगची घोषणा करण्यात आली. ‘#VIVOIPL 2021 अँथम भारताच्या नवीन, धाडसी आणि आत्मविश्वासाच्या भावनेला सलाम करतो. चला सर्वांनी #IndiaKaApnaMantra वर विश्वास ठेवूया. या मोसमात आपल्या आवडत्या संघाचा यशस्वी मंत्र होईल असे आपल्याला काय वाटते ते आम्हाला सांगा. #VIVOIPL 2021 – 9 एप्रिलपासून सुरू होईल!’ असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!