उस्मानाबाद: उस्मानाबाद नगरपरिषदेने महावितरणाचा एकही रुपया थकबाकी न ठेवणारी राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे. याबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता भारत जाडकर यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचा विशेष सत्कार केला आहे.
उस्मानाबाद नागपालीकेची २०१८ मध्ये पाणीपुरवठा व पथदिव्यांची अशी एकूण थकबाकी ६ कोटी ५४ लाख ५४ हजार इतकी होती. शासनाच्या निर्णयानुसार उस्मानाबाद नगरपालिकेची ५० टक्के रक्कम नगर विकास खात्याने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून परस्पर महावितरणला दिली व उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाने पाडून दिलेल्या १५ हप्त्यांमध्ये पालिकेने वेळेत भरली आहे. उस्मानाबाद नगरपरिषदेचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तसेच पथदिव्यांचे कनेक्शन, नगरपालिका कार्यालय व शाळेचे कनेक्शन असा एकूण ३५ ते ४० लाख रूपये वीजबिलाच भरणा केला जातो.
उस्मानाबाद नगर पालिका १ रूपयाही थकबाकी नसलेली महाराष्ट्रातील एकमेव नगर पालिका ठरली आहे. त्यामुळे सुनियोजनाबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता भारत जाडकर यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांचा नगर परिषदेत येऊन यथोचित सत्कार केला व अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या
- विलासराव देशमुख यांच्या नावाच्या प्रतीक्षेत ‘सर्वोपचार’ रुग्णालय!
- आत्मदहनाची धमकी देणाऱ्या माजी सैनिकाला अटक
- मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं – नाना पटोले
- पन्नास दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाकडे राजकारण्यांची पाठ
- ‘तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

