Share

टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर

Published On: 

पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली.

बॉल अडवण्यासाठी अय्यरने उडी मारली, त्यावेळी तो डाव्या खांद्यावर पडला, यानंतर अय्यरला खूप त्रास झाला. लगेचच टीम इंडियाचे फिजियो नितीन पटेल मैदानात आले. दुखापत गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. अय्यरच्याऐवजी शुभमन गिलला  फिल्डिंगला बोलावण्यात आलं.

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असेल तर त्याला वनडे सीरिजमधूनही बाहेर राहावं लागू शकतं. बीसीसीआयकडून (BCCI) मात्र याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. श्रेयस अय्यरला जर उरलेल्या दोन मॅचमध्ये खेळता आलं नाही, तर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.

सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर भारताला उपयोगी ठरू शकतो. टी-20 सीरिजमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या पहिल्याच टी-20 इनिंगमध्ये सूर्यकुमारने 28 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!