Share

कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यात होणार मध्यरात्रीपासून लॉकडाऊन

Published On: 

नांदेड : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ३६ हजारावर गेली आहे. गेल्या १५ दिवसातील कोरोना रुग्णसंख्या ९ हजारावर गेली आहे. कालचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ३० होता. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

या दरम्यान शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकन ची दुकाने, पार्लर, सलून,सार्वजनिक ठिकाणी फिरणे हे सर्वतः बंद राहणार आहे.

व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ११ दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केल आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व लॉक डाऊन दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!