Share

शिखर धवनने सांगितला टीमबाहेर राहण्याचा अनुभव ; म्हणाला…

Published On: 

पुणे : भारताकडून सलामीवीर शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावत सर्वाधीक ९८ धावा केल्या. शिखरचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. तर पदार्पण करणाऱ्या कृणाल पाड्यांने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अष्टपैलु कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध क्रृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली. शिखर-रोहित या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र अडखळत खेळणारा रोहित २८ धावावर असताना स्टोकस् च्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर धवनने कर्णधार कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

यादरम्यान, कोहलीने ६ चौकारांच्या मदतीने आपले ६१वे अर्धशतक पुर्ण केले. ५६ धावावर बाद झाल्यानंतर धवनने मोर्चा संभाळत आपला तडाखा सुरुच ठेवला. शतकासाठी अवघ्या दोन धावा हव्या असताना शिखर धवन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुणे येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिखर फॉर्मसाठी झगडत होता. मात्र पुण्यातील एमसीए मैदानावर शिखरने पुन्हा एकदा जुन्या अंदाजात बॅटिंग करत गब्बर इनिंग खेळली. मॅचनंतर बोलताना त्याने संघाबाहेर असण्याचा अनुभव शेअर केला. ‘मी नेहमी सकारात्मक विचार करतो. मी जेव्हा मॅच खेळत नव्हतो तेव्हा टीम इंडियासाठी मी अधिक काय काम करु शकतो, असा माझा विचार सुरु असायचा. यामध्ये पाणी घेऊन जायचं आणि दमदार फरफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंना पाणी पाजण्याविषयीचे माझ्या मनात विचार सुरु असायचे’, असं शिखर धवनने सांगितलं.

पुढे तो म्हणाला, संघाबाहेर असण्याचा काळ पूर्ण मेहनतीचा काळ असतो. जिम, रनिंग, नेट सेशन या काळात चांगल्या प्रकारे सुरु होतं. या सगळ्याचा मला फायदा झाला, असं शिखर म्हणाला. शतक हुकण्याच्या प्रश्नावर शिखर धवनने खास उत्तर दिलं. “साहजिकच थोडी निशारा तर होते पण मी असा व्यक्ती नाही की जास्त आनंद होतो किंवा जास्त दु:ख होतं. मी शतक ठोकण्याच्या घाईत नव्हतो. मी फक्त एक शॉट्स लावण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच नादात मी आऊट झालो. पण नेहमी नेक्स्ट टाईम असतं….”

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!