🕒 1 min read
मुंबई: काल (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प होता. भाजपने भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री महाराष्ट्राचे असूनही राज्याला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नसल्याची टीका केली. यावरच आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Union Minister of State for Finance Bhagwat Karad) यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात राज्यानुसार कोणत्याही तरतुदी करण्यात आल्या नाहीत. तर विविध खात्यांनुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहोत. राज्याला काय लागणार याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे केंद्रातील राज्यातले जेवढे मंत्री असतील तेवढे प्रयत्न करून बजेटमधून महाराष्ट्राला भरघोस वाटा मिळावा यासाठी प्रयत्न करतील असे भागवत कराड यांनी म्हटले आहे.
तसेच अजित पवारांना माझा प्रश्न आहे की, अर्थसंकल्प जाहीर झाला त्यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये मुख्यमंत्री किंवा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी येणं अपेक्षित होतं. पण त्यांनी कुणालाही पाठवलं नाही. सचिव पदावरील अधिकारी एकदा आले होते, पण त्यांना काहीही मांडता आलं नाही. तसेच राज्यातले रखडलेले प्रकल्प किंवा इतर मागण्याही त्यांना मांडता आल्या नाहीत. त्यामुळे किमान राज्यमंत्र्यांना तरी पाठवणे गरजेचं होतं. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीतही कोणी आले नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यस्त असतील, किंवा त्यांची शस्त्रक्रिया झाली होती, पण अर्थमंत्री किंवा राज्यमंत्री यांनी यायला हवे होते. यावरून त्यांना तेव्हा किती रस होता हे कळतं. आता केवळ टीका करायची म्हणून असं बोलले जात आहे. असे प्रत्युत्तर भागवत कराड यांनी अजित पवारांना दिले आहे.
तसेच अजित पवारांनी राज्याकडून ज्या तुलनेत कर जातो त्या तुलनेत परतावा मिळाला नसल्याचीही टीका केली होती. यावरही प्रतिक्रिया देताना कराड यांनी म्हटले की,’केंद्र सरकार कुठलाही भेदभाव करत नाही, जिथे गरज असेल तिथे केंद्र मदत करत असते. महाराष्ट्राचा विचार करता आम्ही राज्यातील मंत्री आहोत. महाराष्ट्राला वाटा मिळेल याची आम्ही काळजी घेत आहोत.” असा टोलाही भागवत कराड यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आरसीबीने माझे…” ; विराट कोहलीचे भावनिक वक्तव्य
- जित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील १६ भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- “वहिनीसाहेब आवरा स्वतः ला, अन्यथा मानसिक…”,रुपाली पाटलांची अमृता फडणवीसांवर टीका
- बजेटबाबत चेतन भगत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका असताना…
- “अर्थसंकल्प निराशाजनक…”; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
