मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP leader Rupali Patil Thombre) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत त्यांना सल्ला दिला आहे. “आवरा वहिनी स्वतःला, जर भाऊ आवरत नसेल तर तुम्हीच तुमचं स्वतःला आवरा अन्यथा मानसिक संतुलन बिघडले म्हणून तुम्हाला उपचार घ्यावे लागतील”, अशा शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांचावर टीका केली आहे.
भाऊराया वहिनीसाहेब खूप अंधाधूंद वागत आहेत-
“आमचे विरोधीपक्ष भाऊ (देवेंद्र फडणवीस)आडवतच नाहीत, आमच्या वाहिनीला कसल्याही गोष्टीत, आणि याचे प्रचंड दुःख होते. कारण मिसेस माजी मुख्यमंत्री अमृता वहिनीसाहेबांनी या पदाची गरिमा धुळीला मिळवली आहे. त्या नामर्द, नॉटी नवाब, बिघडे पटोले, नन्हे पटोले म्हणतात थोडक्यात उत्तर द्यावे…५० मार्क्स, नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? तसेच रिक्त स्थानाची पूर्ती करा…५० मार्क्स, _____शराब नही होती! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है असे म्हणतात.
मात्र अगोदर अमृता फडणवीस यांनी सांगावे की, त्या कोणत्या पक्षाच्या आहेत. तुम्हीच सांगितले की, माझा कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. मी समाजसेविका आहे. मग एक समाजसेविका असताना तुमची अशी भाषा समाजात कशी चालणार आहे? तुम्ही नक्कीच महाविकास आघाडीसरकारमधील लोक काम करत नसतील तर त्याच्यावर बोलले पाहिजे. मात्र तुमची अशी भाषा समाजात कशी चालणार? त्यामुळे मला आमच्या भावाला सांगायचे आहे की, भाऊराया वहिनीसाहेब खूप अंधाधूंद वागत आहेत.
अमृता फडणवीसांनी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्यावीत-
तसेच माझा अमृता वहिनी यांना सवाल आहे की, शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणारे कोण आहेत? शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारे कोण आहेत? आणि आमच्या महाराष्ट्र पोलिसांची बँक खाती एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गुपचूप वळवणारे कोण आहेत? याची उत्तर तुम्ही देणार आहात का? असा सवालही रुपाली पाटील यांनी केला आहे.
त्यामुळे अमृता वहिनी तुम्ही अगोदर स्वतःला आवरा. तुम्हाला राज्यातील जनतेला सुविधा द्यायच्या असेल तर त्यासाठी नक्कीच बोला. पण माजी मुख्यमंत्र्यांची गरिमा वाया घालवू नका. कारण आता खूप इज्जत गेली. आता ती इज्जत कमवायला खूप कष्ट लागतील त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची नावडती बहिण म्हणून ऐका, पण ऐकाच. कारण समाज तुमच्यामुळे नको त्या वळणावर जात आहे. सोशल मिडिया हा समाजाला काहीतरी देण्यासाठी व्यक्त झाला, तर तेवढे चांगले आहे. त्यामुळे वहिनीसाहेब स्वतःला आवरा. रुपाली पाटील तुम्हाला देवेंद्र फडणवीसांची नावडती बहिण आणि तुमची नणंद म्हणून सल्ला देते आहे. अशा शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बजेटबाबत चेतन भगत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका असताना…
- “अर्थसंकल्प निराशाजनक…”; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया
- भारत विरुद्ध वेस्टइंडीज एकदिवसीय मालिका येत्या ६ फेब्रुवारी पासून
- ‘धक्का बुक्की नही करणेका, टपाटप, टपाटप…’; रुपाली पाटलांचा हिंदुस्तानी भाऊवर पुन्हा एकदा निशाणा
- अभिनेता राजकुमार रावने केला वैवाहिक आयुष्यावर खुलासा, म्हणाला…“पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

