Share

अजित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील १६ भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Published On: 

पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपचे १६ नगरसेवक (BJP Corporators) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहे. असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. यामुळे पुण्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदिल दाखवल्याचेही जगताप म्हणाले.

प्रशांत जगताप एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘पुणे महानगर पालिकेची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर १६ भाजपच्या नगरसेवकांनी माझ्याशी संपर्क साधला. प्रभाग रचना त्यांनी बघितल्यानंतर आणि भाजपची स्थिती पाहता त्यांना वाटले की, राष्ट्रवादीशिवाय आपल्याला आता पर्याय नाही. असे त्यांचे सर्वांचे मत झालेले आहे. पुण्याला मेट्रो सिटी करण्याचे अजित दादांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करणार आहे. काही दिवसातच या नगरसेवकांचा प्रवेश सोहळा टप्प्याटप्प्याने अजित दादांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी खात्री मला आहे. असे जगताप यावेळी म्हणाले.’

भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा झाली, असाही दावा जगताप यांनी केला आहे. तसेच या नगरसेवकांची प्रशांत जगताप यांच्याशी बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकीय गोटात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!