मुंबई : विराट कोहलीने ९ वर्ष आयपीएलमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व केले आहे. २००८ मध्ये आरसीबीने विराटला खरेदी केले होते तेव्हापासून विराट आजलगत विराट आरसीबीचा भाग आहे. तेव्हा विराट अंडर १९ संघात खेळत होता. त्याच्या आरसीबीसोबतच्या १५ वर्षाच्या अनुभवाबाबत विराटने आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दानिश सेठसोबत आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला ” आरसीबीने मला जेव्हा खरेदी केलंतो माझ्या आयुष्यातला इतका प्रभावशाली क्षण होता की मला त्या वेळी ते जाणवलं नाही. पण आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवत कि, तेव्हा आताच्यापेक्षा परिस्तिथी खूप वेगळी होती.” त्यावेळी दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ सुद्धा विराटला खरेदी करण्यास उत्सुक होता. त्याबाबतही विराटने यावेळी सांगितले. ” दिल्लीचा संघ मला खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे मी ऐकले होते. मात्र त्यांना गोलंदाज हवा होता त्यामुळे त्यांनी माझ्या ऐवजी प्रदीप सांगवानला खरेदी केले.”
The RCB Podcast powered by Kotak Mahindra Bank: Trailer
10 episodes, plenty of interesting and never heard before stories about the tournament that made them the superstars they are!
(1/n)#PlayBold #WeAreChallengers #TheRCBPodcast pic.twitter.com/MWPQG3IEwH— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 1, 2022
आयपीएलच्या पहिल्या ऑक्शन आधीच विराटने अंडर १९ संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. निवड झाली तेव्हा विराट संघासोबत मलेशियात होता याबाबतही त्याने सांगितले आहे. “आम्ही सर्वजण अंडर-१९ वर्ल्डकपसाठी मलेशियामध्ये होतो. मला तो दिवस चांगला आठवतो जेव्हा ड्राफ्ट होत होते. अंडर-१९ डायनॅमिक तेव्हा थोडा वेगळा होता. तुम्ही भारतासाठी खेळला नसाल तर तुम्हाला किती रकमेत निवडले जाऊ शकते यावर तेव्हा निर्बंध होते. मला आठवते की आमच्यासाठी तो क्षण खूप आश्चर्यकारक होता. कारण ज्या रकमेत त्यांनी मला निवडले होते ते ऐकून मी वेडा झालो होतो.” विराटला आरसीबीने १२ लाख रुपयात खरेदी केले होते. तर या १५व्या हंगामात तो १५ करोड रुपयात रिटेन झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील १६ भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- “वहिनीसाहेब आवरा स्वतः ला, अन्यथा मानसिक…”,रुपाली पाटलांची अमृता फडणवीसांवर टीका
- बजेटबाबत चेतन भगत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका असताना…
- “अर्थसंकल्प निराशाजनक…”; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया
- भारत विरुद्ध वेस्टइंडीज एकदिवसीय मालिका येत्या ६ फेब्रुवारी पासून


