Share

बजेटबाबत चेतन भगत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका असताना…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होत आहे. तसेच प्रसिध्द लेखक चेतन भगत यांनी देखील या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना अर्थसंकल्पाचे वर्णन अत्यंत निराशाजनक असे केले. आपण जेवढे भाषण ऐकले त्यात ना मनरेगाचा उल्लेख होता ना संरक्षण क्षेत्रासाठी काही ठोस होते. महागाई वाढत असताना मध्यमवर्गाला प्राप्तिकरात काहीही दिलासा नाही. गती शक्ती व डिजिटल चलनाच्या केवळ घोषणाच आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) या अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले, या अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलंय. त्याने म्हटलंय की, मला वाटतं की, मोठ्या निवडणुकांच्या १० दिवस अगोदर कोणतेही मोठे मोफत किंवा लोकांना भुरळ पाडतील अशा घोषणा न करता एक विवेकपूर्ण असा अर्थसंकल्प सादर करण्याची ही कृती खूपच जबाबदार आणि प्रशंसनीय आहे, असे मत भगत यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!