Share

“अर्थसंकल्प निराशाजनक…”; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: यावर्षीचा अर्थसंकल्प दिशाहीन असून त्यातून नोकरदार, आणि सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एकीकडे बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे, पण नोकरीच्या संधी आणि सर्वसामान्याचे दरडोई उत्पन्न घटत आहे. याबाबत सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलेले नाही. त्यात सरकार जुनी स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी लोकांना नवीन स्वप्न दाखवत आहे. पण त्यातही ही नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणता ही मार्ग केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. हा एक दिशाहीन अर्थसंकल्प आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ग्रामीण विकास आणि मनरेगासाठीची आर्थिक तरतूद मोदी सरकारने कमी केली आहे. त्यामुळे ग्रामीण विकासात अडथळा निर्माण होणार आहे. मनरेगाची तरतूद कमी केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चालणाऱ्या योजनांवर परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत रक्कम सोडली तर इतर कोणती ही योजना जाहीर केलेली नाही. करोनामुळे भारताचे शेतीवरील अवलंबन वाढले आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी शेतीवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे ही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकार ८० लाख नवीन घरे बांधू इच्छित आहेत. पण सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीचे काय? असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ५ जी सेवा सुरु करून ई शिक्षणाच्या तरतुदी निर्मला सीतारामन यांनी सांगितल्या आहेत. पण ग्रामीण भागात अजून ४ जी सेवाही नीट उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. हे ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. फक्त मोबाईल स्वस्त करून चालणार नाही तर इंटरनेट सुद्धा स्वस्त झाले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. केंद्राने सामाजिक क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!