पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तत्कालीन महायुती सरकारच्या काळात त्यांना क्लीनचिट देण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनानामित्त बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
भिडे आणि एकबोटे यांच्यावर चार्जशीटचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील दोषींची गय केली जाणार नाही असं भाष्य केलं होतं.
फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह आंबेडकरवादी संघटनांनी या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती. आता, शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आहे. ते कारवाई का नाही करत ? असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. ‘सत्तेत येऊनही महाविकास आघाडी संभाजी भिडेंवर कारवाई का करत नाही ?’ असा सवाल त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- ‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगतायत, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला’
- अगस्तीतील शुक्राचार्य कोण ओळखा अन् त्यांना बाजूला करा; शरद पवारांची पिचडांवर टीका
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- गंभीर ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनंतर मंत्रालयातील ‘त्या’ फायलीचा शेराच बदलला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

