🕒 1 min read
मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. तसेच अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?, असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘अक्कलदाढ एवढी उशिरा का येते? याचा अभ्यास करावा लागेल. अडीच वर्षानंतर बोलत आहात. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. तुम्ही तुमचं बघा’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भाजप शासित राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? काल शिवाजी पार्कमध्ये भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या. त्यामुळे लोकांना वाटलं कालची सभा भाजपची आहे.’ तसेच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एवढी विकासाची कामे केली. मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले. ते राज ठाकरेंना दिसले नाही का?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘KGF’ चॅप्टर 2 बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार का?
- “शिवाजी पार्कातील कालचा भोंगा…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
- IPL 2022 : नवी मुंबईत दिसला सुपरमॅन..! बटलरच्या ‘त्या’ कॅचचं कौतुक करावं तेवढं कमीच; पाहा VIDEO
- IPL 2022 : मुंबईचा अजून एक पराभव..! रोहित शर्मानं कोणावर फोडलं खापर? वाचा सविस्तर!
- IPL 2022 : सलग दोन मॅच गमावलेल्या CSKसाठी शास्त्री मास्तरांचा सल्ला; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
