🕒 1 min read
कोल्हापूर: यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. या विषयावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच भाष्य केलं. म्हणाले, मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही. पुढे त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवरही भाष्य केले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना पवार म्हणाले, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची व्यवस्था केली आहे. ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र बसून विचार यासंदर्भात करावा. उद्धव ठाकरे आणि मी बैठक बोलवावी. ती बैठक मुंबईत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.
आम्ही इतरांशी बोललो नाही. ममतादीदींनी चांगल्या सद्भभावनेतून भूमिका मांडली आहे. अशी बैठक घ्यायची असेल तर सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल. आंध्रप्रदेश, तेलंगना, राजस्थान, तामिळनाडू येथील मुख्यमंत्री आदी सर्वांशी चर्चा करून एकत्र बसून निर्णय घेऊ. राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू, असे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार
जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
“निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही” – संजय राऊतांचा भाजपला टोला
“आमच्यासाठी काही करू शकत नसाल तर…”; शरद पवारांच्या वक्तव्यावर चित्रपट निर्माते आक्रमक
“…त्याप्रमाणे मदरशांवर धाडी टाकायला हव्या”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
