🕒 1 min read
मुंबई : मुंबई इंडियन्स संघाची आयपीएलमध्ये आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. मुंबई संघाला दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थान रॉयल्सने शनिवारी मुंबईविरुद्ध २३ धावांनी विजय नोंदवला. या पराभवानंतर रोहित शर्माने काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला.
रोहित शर्मा म्हणाला, ”मला वाटले की त्यांनी चांगली फलंदाजी करून १९३ धावा केल्या. बटलरने अपवादात्मक खेळी खेळली, आम्ही आऊट करण्यासाठी सर्व काही केले. पण मला वाटले की त्या खेळपट्टीवर १९३ धावांचा पाठलाग करता आला असता, विशेषतः जेव्हा आम्हाला ७ षटकात ७० धावांची गरज होती.”
”या गोष्टी घडतात. यातून आपण काहीतरी सकारात्मक शिकू शकतो. बुमराहने चांगली गोलंदाजी केली. तिलक अपवादात्मक खेळला, तर इशानची फलंदाजीही उत्कृष्ट होती. दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत फलंदाजी केली असती, तर फरक पडला असता असे मला वाटते. सूर्यकुमार यादव आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. एकदा तो तंदुरुस्त झाला की तो संघात येईल त्यामुळे त्याने बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे”, असेही रोहितने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
- राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा…”
- अभिनेत्री ‘मलायका अरोरा’चा कार अपघात; मनसेच्या नेत्याने केले रुग्णालयात दाखल
- “मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार
- जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
- “निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही” – संजय राऊतांचा भाजपला टोला
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
