Share

IPL 2022 : सलग दोन मॅच गमावलेल्या CSKसाठी शास्त्री मास्तरांचा सल्ला; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली यंदा आयपीएल खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सलग तीन पराभवानंतर जडेजा सध्या दडपणाखाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शास्त्रींच्या मते, चेन्नई सुपर किंग्जच्या एका किंवा दुसर्‍या सलामीवीराला सातत्याने उत्कृष्ट खेळी करून संघाला पुढे न्यावे लागेल. तसे न झाल्यास संघाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

खरेतर, आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून त्यांचा पराभव झाला. पहिल्या सामन्यात संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली नाही.

शास्त्री म्हणाले, ”जेव्हा दोन्ही सलामीवीर कामगिरी करत नाहीत, तेव्हा ही चिंतेची बाब आहे. सलामीवीरांसाठी लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे आहे, कारण संघाने दोन सामने गमावले आहेत. कर्णधार नवीन असल्याने त्याच्यावर दबाव आहे. धोनी फॉर्मात असला तरी सलामीवीराने धावा केल्या नाहीत तर संघाला अडचणींचा सामना करावा लागेल. ऋतुराज गायकवाडने स्वत:ला थोडा वेळ द्यावा. तो चेंडूला खूप चांगले टायमिंग करतो, त्यामुळे त्याने संथ सुरुवात करून डाव पुढे नेला पाहिजे.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!