🕒 1 min read
मुंबई : जोस बटलरने आयपीएल २०२२मध्ये शानदार शतक ठोकले आहे. त्याने शनिवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हे शतक (MI vs RR) साकारले. यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह १०० धावा केल्या. शतकानंतर क्षेत्ररक्षण करताना बटलरने अप्रतिम झेल टिपला. हा झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
राजस्थानचा लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहल १६वे षटक टाकत होता. टिम डेव्हिड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डॅनियल सॅम्सने उंच फटका खेळला. यानंतर कव्हरवर क्षेत्ररक्षण करणारा जोस बटलर मिडऑफच्या दिशेने धावला. त्याने हवेत सूर मारत एक अप्रतिम झेल पकडला.
बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने ८ बाद १९३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ८ बाद १७० धावाच करू शकला. अशा प्रकारे राजस्थानने हा सामना २३ धावांनी जिंकला. राजस्थानचा हा चालू मोसमातील हा सलग दुसरा विजय असून त्यांनी गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : सलग दोन मॅच गमावलेल्या CSKसाठी शास्त्री मास्तरांचा सल्ला; म्हणाले…
- IPL 2022 : मुंबईचा अजून एक पराभव..! रोहित शर्मानं कोणावर फोडलं खापर? वाचा सविस्तर!
- मोदींना अनुकूल अशी राज ठाकरेंची भूमिका; शरद पवारांचा जोरदार पलटवार
- याला म्हणतात नाटकवेडा! सागर कारंडेनं खच्च भरलेल्या लोकलमधून केला प्रवास
- “एकत्र बसून निर्णय घेऊ, राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू” – शरद पवार
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
