Share

सोनिया मातोश्रींचे जोडे डोक्यावर घेणाऱ्यांना बायबल डोक्यावर लावल्यामुळे एवढा ताप का होतोय?

Published On: 

मुंबई: युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोप यांच्या सहवासात होते. पोप यांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला आणि मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली.मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? असा खोचक सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून मोदींना टोला लगावला आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

सोनिया मातोश्रींचे जोडे डोक्यावर घेणाऱ्याना बायबल डोक्यावर लावल्यामुळे एवढा ताप का होतोय? असा सवाल करत दुसऱ्या धर्माचा आदर करणे हे हिंदुत्व आहे. हिंदुत्वाशी काडीमोड घेतलेल्या शिवसेनेला याचा विसर पडलेला दिसतोय. अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

दरम्यान आपला हिंदू धर्म हेच तर शिकवितो. स्वधर्माचे संरक्षण तर आपण केलेच पाहिजे, पण परधर्माविषयीही आदरभाव ठेवला पाहिजे. अन्य धार्मिक ग्रंथ मस्तकी लावले पाहिजेत अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तौबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल! अशी टीका सामनातून संजय राऊत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!