बुलढाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचा वाद काही नवा नाही. संधी मिळेल तेव्हा राणे आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एका मंचावर आले तरीही त्यांनी एकमेकांना लक्ष्य करणं सोडलं नाही. दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हा वाद सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे आणि पूरग्रस्त भागाकडे लक्ष नसल्याचं म्हणत मुख्यमंंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत.
साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? असा सवालही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बापाच्या नावावर आणि जीवावर राजकारणात असलेले सुप्रिया सुळेंसारखे फुटकळ नेते…’ भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आर्यनच्या बचावातून वेळ मिळाला असेल तर आता शेतकरी आत्महत्येकडे लक्ष द्या’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- न्यूझीलंडचा भारतावर ८ गड्यांनी विजय; भारताचा लाजिरवाणा पराभव
- ‘… तसे केले नाही, म्हणून आम्ही जिंकलो नाही’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची प्रतिक्रिया
- ‘अधिकारी नोकरी करत असताना मंत्री जेलची धमकी देतोय’, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

