Share

‘मोदी अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, दुसरे कोणी केलं असतं तर..’

Published On: 

मुंबई: युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. पोपसाहेबांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला आणि मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदी हे इटलीत गेले आणि अचानक पोप यांना भेटले. चारेक वर्षांपूर्वी मोदी हे विमान प्रवासात असताना अचानक इस्लामाबादेत उतरले होते आणि नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते. कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वत:ची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करत असतात. हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तौबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.

कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वत:ची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करत असतात. मोदी हे पोप यांना भेटले. त्यांनी या सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरुंचे आशीर्वाद घेतले. पोपसाहेबांचे स्थान जगात मोठे आहे. त्यांच्या शब्दाला आणि अस्तित्वाला मान आहे. पोप यांना भेटणे यात एक आनंदच असतो. व्हॅटिकनच्या माध्यमातून जगभरात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे सामाजिक कार्य सुरूच असते. व्हॅटिकनची आर्थिक ताकद मोठी आहे. व्हॅटिकनची आर्थिक उलाढाल चार अब्ज युरो इतकी आहे. व्हॅटिकनची स्वत:ची बँक आहे. त्या बँकेची उलाढाल आपल्या रिझर्व्ह बँकेच्या पन्नासपट आहे. जगातील सगळ्य़ात श्रीमंत धर्म म्हणून ख्रिश्चन धर्माचाच उल्लेख करावा लागेल. जगातील 55 टक्के संपत्तीचे मालक ख्रिश्चन धर्मीय आहेत. त्याखालोखाल 5.8 टक्के मुस्लिम, हिंदू 3.4 टक्के, ज्यू 1.2 टक्के असा क्रम लागतो. म्हणजे जगातील श्रीमंत धर्मगुरुंना भेटायला आपले पंतप्रधान गेले. मौदी आणि पोप यांच्यात म्हणे जगातील गरिबी निर्मूलन तसेच हवामान बदलावर चर्चा झाली. असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

गरिबीचे निर्मूलन झाले आहे. अमेरिका, युरोपातील अनेक ख्रिश्चन देशही आपल्या गरीब जनतेची चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. या राष्ट्रांना आर्थिक महासत्ता म्हटले जाते. मोदी आणि पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? मोदी आणि पोप यांच्यात चर्चा सुरु असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. असा टोला संजय राऊत मोदींना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!