🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर काल (६ एप्रिल) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांना खोचक सवाल केला आहे.
या संदर्भात इम्तियाज जलील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा? का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वतःचे खेळ आहेत’, असे जलील म्हणाले.
दरम्यान, याविषयी काल पत्रकारांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले की,‘संजय राऊत यांच्या मालकीची केवळ अर्धा एकर जमीन अलिबागमध्ये आहे. अशा क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ पत्रकारावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करणे योग्य नाही.’
महत्वाच्या बातम्या
- “अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र
- “असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा
- “माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
- “मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
