Share

मंत्री भुमरेंवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल तरीही पैठणमध्ये भाजप गप्प का?

Published On: 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मंत्री भूमरेंचे प्रतिस्पर्धी असलेले आणि निवडणुकीत पराभूत झालेले, पैठण मधील  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दत्ता गोर्डे हे मंत्री भूमरेंच्या मागे हातधून लागले आहे. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भूमरेंवर पैठण मधील ३० कोटीचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. एवढे सगळे होत असतांना मात्र, पैठण मधील भाजप गप्प असल्याचे चित्र आहे.

पैठण नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या एका भूखंडात तब्बल ३० कोटींचा फायदा मंत्री भूमरे पिता पुत्रांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांनी केला. ते अनेक दिवसांपासून भूमरे यांची पैठण मधील अनेक प्रकरण काढून त्यांच्यावर विविध आरोप करीत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही हि नेते सत्ताधारी पक्षात आहे. असे असतांना देखील अद्याप पर्यंत या प्रकरणात भाजपने उडी घेतली नाही. त्यामुळे आयती आलेल्या संधीचा वापर भाजपला करता येत नसल्याची चर्चा सध्या पैठणमध्ये सुरु आहे.

सध्या पैठणची नगर परिषद हि भाजपच्या ताब्यात आहे. दत्ता गोर्डे हे त्या नगर परिषदेत नगरसेवक राहिलेले आहे. परंतु भूखंड लाटण्याचा आरोप करून त्यांनी भूमरे यांच्या समोर नवीन पेच निर्माण केला आहे. एवढे सगळे सुरु असतांना पैठण अथवा जिल्ह्यातील एकही भाजप पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याने पुढे येऊन  भूमरे यांच्यावर झालेल्या आरोपांवर एक शब्द हि काढला नाही. त्यामुळे भूमरे यांची शिवसेनेत असूनही जिल्ह्यातील भाजपवरची पकड मजबूत असल्याच्या चर्चेला उधान आलेले आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!