Share

इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

मुंबई : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका मालिका नुकतीच पार पडली. मात्र ही मालिका संपल्यानंतर इंग्लंडच्या संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. श्रीलंकेविरुद्धच्या खेळलेल्या संघातील तीन खेळाडू आणि ४ संघ व्यवस्थापन समीतीचे सदस्य यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

यादरम्यान भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये सुटीची मजा घेत आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुटी घालवत आहे. मात्र इंग्लंडमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने इंग्लंडमध्ये खेळाडूंच्या सुरक्षीततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या खेळाडुंना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय संघाला आज ७ जुलै आणि शुक्रवारी ९ जुलै रोजी दुसरा डोस दिला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२१च्या स्थगीतीनंतर भारतीय संघाच्या बहुतेक खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. यादरम्यान १४ जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ एकत्र येणार आहे. यावेळी त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!