🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसापासुन श्रीलंका क्रिकेट या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसापुर्वी श्रीलंका संघातील खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संघातील काही खेळाडूंनी बायो बबलचे उल्लंघन केल्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाची प्रतिमा मलिन झाली होती.
आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. श्रीलंकेचा माजी प्रदर्शन विश्लेषक सनथ जयसुंदरा भ्रष्टाचार प्रकरणात अडकला आहे. सनथवर क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी सनथवर कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार समितीने सनथला दोषी ठरवलं आहे. या कारवाईत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होण्यापासुन ७ वर्षाची बंदी घातली आहे.
२०१९ साली श्रीलंका अ दौऱ्यात त्याने निवड समितीला प्रभावित करण्यासाठी क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न केला.असा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी सनथ दोषी आढळला. सनथ ११ मे २०१९ पासुन निलंबित आहे. या प्रकरणात सनथसोबत दोन जण दोषी आढळले. त्यावेळी संघाची निवड, सामन्याचा निकाल, संचालन या गोष्टीसाठी प्रभावित करण्यासाठी लाच देण्याच प्रयत्न केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘युसूफ भाई, आपल्या छोट्या बहिणीला सोडून का गेलात?’ ; लता दीदींनी केली भावूक पोस्ट
- स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’वर रंगली औरंगाबादमध्ये वेगळीच चर्चा
- HDFC बँकवर नॅशनल हाऊसिंग बँकेने केली मोठी कारवाई
- ‘शरमेने मान खाली घालण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत’ ; चंद्रकांत दादांचा टोला
- डॉ. भागवत कराड यांची दुसऱ्यांदा लॉटरी? केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
