मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नव्हता. या विस्तारात ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, सुशील कुमार मोदी, दिलीप घोष, अनुप्रिया पटेल यांच्यासह इतर अनेक चेहरे मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकतात.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. या दोन्ही खासदारांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचं सांगितलं जात आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत.
त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मंत्रिमंडळ बदलून काय होणार ? सरकारच बदला…देश वाचेल’
- ‘भास्कर जाधव हे नरकासुरा सारखे आहेत’, नितेश राणेंचा प्रहार
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

