मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघानी जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी अनेक संघानी मोठे फेरबदल करण्याचा निर्णयही घेतला आहे. यादरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिद खानची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम १२ संघात अफगाणिस्तानचा समावेश झाल्याने त्यांचा अत्मविश्वास अधीच द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला यावेळी विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी खेळण्याची गरज नाहीये. राशिद खानने काही दिवसापुर्वीच कर्णधारपदासाठी नकार दिला होता.
I’m a great believer that a captain is as good as his team. It is Afghanistan ???????? that gave me the name RASHID KHAN & it is my duty now to serve my country & my team. Thank you @ACBofficials for the trust & believing in me. It is a dream journey & my fans support will be the key.
— Rashid Khan (@rashidkhan_19) July 6, 2021
मात्र अखेर त्याच्याच गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. यावेळी बोलताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. या पत्रकात ते म्हणाले, ‘राशिद खान ही अफगाणिस्तान संघाची जागतीक स्तरावर ओळख आहे. त्याचा आनुभव आणि त्याची नेतृत्व करण्याची शैली या सर्व गोष्टीचा विचार करुन आम्ही त्याला कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.’ नदीबुल्लाह जरदानची उपकर्णधापदी नेमणुक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हे एक सांस्कृतिक नुकसान आहे’; दिलीप कुमारांच्या निधनानंतर मोदींनी व्यक्त केले दु:ख
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश शिवसेना-कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!


