Share

‘भारताने अद्यापही तालिबानवर बंदी का घातली नाही?’, ओवेसींचा मोदींना सवाल

Published On: 

लखनऊ: अफगाणिस्तानवर गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला मोदींना संतप्त सवाल केला आहे. ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केला आहे. काबुलमध्ये झालेला आत्मघातकी हल्ला हा मोठ्या धोक्याचा इशारा आहे. यामुळे भारत सरकारने तालिबानबाबत आपलं मौन सोडून वेट अँट वॉचच्या धोरणातून बाहेर पडावं, असे वक्तव्य ओवेसी यांनी केले आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे भारताला येणाऱ्या काळात नुकसानच होणार आहे. आता तालिबानसोबत जैश ए मोहम्मदही तिथे सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनांनी भारतात रक्तपात केला आहे. यामुळे ही चिंतेची बाब आहे. २०१३ पासूनच ते आतापर्तुयंत २० वर्षांपासून तुम्ही काय करत आहात? मोदी सरकारला आता साडेसात वर्षे झाली आहे.आतापर्यंत मोदी सरकार काय करत आहे.  असा सवाल करत त्यांनी केला आहे.

भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरत आहे. आता निवडणुका आल्यावर हे तालिबान-तालिबान करतील. तालिबानला साथ द्यायची की नाही? हे आपण आधी ठरवावं. सरकार यावर उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. सरकारने मौन धारण केलं आहे. आपल्याला आता एका नव्या परराष्ट्र धोरणाची गरज आहे, असा सल्लाही असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!