Share

‘विराट ‘या’ दिवशी करणार शतकी खेळी’; 19 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी 

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : भारतीय कर्णधार विराट कोहली कधी शतक झळकावेल, हा एक मोठा प्रश्न आहे. इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण त्याने आपल्या खराब फलंदाजीने सर्वांना निराश करणे सुरूच ठेवले आहे. तो अर्ध्या शतकापर्यंत देखील पोहचू शकलेला नाही. विराट कोहलीच्या खराब फलंदाजीचा टीम इंडियाच्या कामगिरीवरही परिणाम होताना दिसत आहे.

अशातच भारताच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळणारा आसामचा फलंदाज रायन परागने विराट कोहलीबद्दल एक भाकीत केलं आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात विराट कोहली शतक ठोकेल. त्याने भारत विरुद्ध इंग्लंड हे हॅशटॅगही केले. रेयार पराग विराट कोहलीचा मोठा चाहता आहे आणि त्याला खूप फॉलो करतो.

विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 70 शतके केली आहेत, ज्यात वनडेमध्ये 43 आणि कसोटीत 27 शतके आहेत. त्याचवेळी, 2019 मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात त्याने आपले शेवटचे शतक झळकावले आणि तेव्हापासून त्याला तसे करता आले नाही. तेव्हापासून विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये शतकाशिवाय 50 डाव खेळले आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर, विराट कोहलीने हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 7 धावा केल्या आणि त्याने शेवटच्या चार डावांमध्ये फक्त 69 धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात संघर्ष करत आहे. टीम इंडिया सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!