Share

जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे

Published On: 

अहमदनगर : युपीए सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली होती. देशातील भ्रष्टाचाराला आला घालण्यासाठी महत्वाचे कायदे अस्तित्वात यावे यासाठी अण्णांनी आधीच्या सरकारच्या काळात आंदोलन केले होते. मात्र, ‘केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची केलेल्या अवस्थेवरून अण्णा गप्प का आहेत ? झोपले की काय?’ असे सवाल समाज माध्यमांमधून केला जात आहेत.

मधल्या काळात अण्णांनी मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र केंद्र सरकार त्यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले होते. आता अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. मी जागाच आहे’, असं हजारे यांनी म्हटलं आहे.

देश बचाव जनआंदोलन समितीनं गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी, आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. अन्यथा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर हजारे यांनी या समितीला चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यांच्याशी चर्चा करताना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल. आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळं सरकारलाही हे करणं शक्य होत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!