Share

कॉंग्रेसच्या कार्यकारणीत राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा यांना पक्षाने दिली मोठी संधी, भावूक होऊन म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने सुद्धा कंबर कसली असून काँग्रेसच्या नव्या कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.

उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या. याअगोदर हिंगोलीत मी राजीवच्या साथीने काम करायचे पण आज मी एकटी पडलीय, अशावेळी राजीवला मिस करतीय, असं म्हणत त्यांनी राजीव यांच्या आठवणी जागवल्या.

तर, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर लेटर बॉम्ब फोडणाऱ्या आशिष देशमुखांनाही संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकरणी अखेर जाहीर झाली आहे. यामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांची वर्णी लागली आहे. 18 उपाध्यक्ष 65 जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरींची यादी प्रसिद्ध केली आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय.

दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे आणि हे प्रमाण 9 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळेच जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारिणीमध्ये विविध जातींचा समतोल राखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!