मुंबई: आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. यावेळी ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत ठोस निर्णय अजून झाले नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांनी म्हटले आहे.
यावेळी झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. मात्र यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित होते. यावरूनही अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राज्यपाल भवन भाजपा कार्यालय झालं आहे’, कॉंग्रेसचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

