वाशिम : परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी पूजाचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती. या आत्महत्ये मागे शिवसेनेचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप होत होता. यामुळेच त्यांना मंत्रिपदाचा द्यावा राजीनामा लागला होता.
आता संजय राठोड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्याला पुन्हा एकदा सन्मानाने मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वाशिममधल्या पोहरादेवी इथल्या संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
”मंत्रीपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, चौकशी झाल्यानंतर पुन्हा सन्मानाने मंत्रिपद मिळेल,” अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले, ”मला पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली तर मला आवडेल. शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रिपद मिळालं तर मला आणखी चांगलं काम करता येईल. पोहरागडचा विकास आणि महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने काम करता येईल.”
महत्त्वाच्या बातम्या :
पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर…”
“शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं म्हणजे…”, यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर
“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत
“आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”, यशोमती ठाकूर यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

