मुंबई : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलता असतांना ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते,’ असे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले. दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘थोडक्यात उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर चित्र वेगळं असतं…’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं. चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे.’ तसेच शरद पवार आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार’, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- “आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”, यशोमती ठाकूर यांचे मोठे वक्तव्य
- JNU Violence : मांसाहार केल्यावरून ABVP आणि JNUSU आमने-सामने; वाचा सविस्तर
- “मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर…”, करणी सेनेचा इशारा
- “भाजपचे लोक पिसाळलेला कुत्रा…”; संजय गायकवाड आक्रमक
- “…हीच परंपरागत शिवसेनेची जागा मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला दिली”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र


