Share

भाजपचे सर्व नेते धुतल्या तांदळाचे, EDची पिडा फक्त विरोधकांच्या मागेच का ?

Published On: 

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकलेत.शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता. 25 मे रोजी अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती.१६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. या छाप्यानंतर लवकरच देशमुख यांच्याकडेही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. त्या अनुषंगानेच ही कारवाई आहे.

दरम्यान, या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीतील नेते देशमुख यांच्या बचावासाठी पुढे येत असून भाजप आणि ED वर अनेक गंभीर आरोप करत आहेत.शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील या कारवाईनंतर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

या कारवाईमुळे राज्यातील नेत्यांवर विनाकारण आरोप करुन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. सोबतच सर्व एजन्सीचा वापर करायचा अनिल देशमुखांकडे काही सापडत नाही म्हटल्यावर त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार चेक करण्याचा हा प्रकार आहे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक,संजय राऊत यांच्या पत्नी, एकनाथ खडसे,शरद पवार,राज ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांना EDने नोटीसा पाठवल्या मात्र गेल्या काही काळात भाजपमधील एकही नेता ED च्या रडारवर का येत नाही हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.संजय राऊत यांनी भाजपच्या काही नेत्यांची यादी आपल्याकडे असून  त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान EDला दिले होते मात्र ना राऊत यांनी ती यादी दिली ना EDने स्वतः काही कारवाई केली. त्यामुळे भाजपचे नेते खरंच एवढ्या धुतल्या तांदळाचे आहेत का असा सवाल उपस्थित करायला देखील वाव आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!