Share

‘संजय राऊतांचं नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता?’, चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

पुणे : सत्ता असो वा नसो शिवसेना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाचा पक्ष आहे. सर्वाना आपला पक्ष वाढवण्याचा नैतिक अधिकार आहे. आगामी पुणे महापालिका निडणुकीत महाविकास आघाडी असो वा नसो शिवसेना कोणत्याही परिस्थितीत ८० जागा लढवणार असल्याची घोषणा आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात केली होती.

यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावेळी पाटील यांनी, संजय राऊतांचं नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता?, असा टोला लगावला. तसेच राऊतांनी ८० जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात, आमच्या त्यांना शुभेच्छा, असंही पाटील यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे आजही आमचे नेते
राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजप नेते अस्वस्थ आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांची तळमळ सुरूच आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ खडसे आजही आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यानंतर तरी त्यांनी खरं बोलावं असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, गेल्या दीड वर्षात आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकले. आम्ही काही अस्वस्थत नाही. आम्हाला फसवले गेले याचे दुःख आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!